शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Published: November 05, 2016 1:21 AM

पीककर्ज : मागण्यांबाबत शासन उदासीन

नाशिक : द्राक्षबागांसाठी जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन व प्रशासकीय पातळीवरही उदासीनतेचेच प्रदर्शन घडल्यामुळे नाशिक दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून गुप्त बैठकांना जोर आला असून, गडकरी यांच्या उपस्थितीत शहरात तीन ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याने त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी हे आंदोलन केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील नाशिक, निफाड व दिंडोरी या तीन तालुक्यांतील सुमारे एक लाख शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करूनही ते देण्यास जिल्हा बॅँकेने असमर्थता व्यक्त केल्याने शेतकरी ऐन द्राक्षाच्या हंगामात अडचणीत सापडले आहेत. या संदर्भात जिल्हा बॅँकेच्या सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित करून संचालकांचे लक्ष वेधण्यात आले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याही कानी तक्रार टाकण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला, परंतु आश्वासना पलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले, तथापि, जिल्ह्णात नगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने आता प्रशासनानेही त्यातून अंग काढून घेतले आहे. (प्रतिनिधी)