नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अंमलबजावणीच्या अटीवर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर विविध जिल्ह्यांमधील स्थिती लक्षात घेऊन टप्पेनिहाय तेथील व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, नाशिक वनवृत्तामधील निफाड तालुक्यातील रामसर दर्जाचे नांदूर-मधमेश्वर, अहमदनगरचे कळसूबाई-हरिश्चंद्रगड, जळगावचे यावल आणि धुळ्याचे अनेर डॅम अशा चारही अभयारण्यांमध्ये पर्यटकांसह निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकारांना अभयारण्यांच्या नाक्यांवर तपासणी करून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सध्या नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षणाचा हंगाम नाही, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. मात्र, वर्षा सहलींसाठी कळसूबाईसह अन्य अभयारण्यांमध्ये पर्यटक वाढण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या रोजगाराला चालना मिळावी, या उद्देशाने अभयारण्यांचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले केले जात असल्याचे अंजनकर यांनी सांगितले.भंडारदऱ्याला वाढणार पर्यटकांचा ओघपावसाळ्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची संख्या वाढलेली असते. पांजरे, उडदावणे, घाटघर, रतनवाडी या भागांत वन्यजीव विभागाने स्वच्छतागृहांची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जाऊ नये. अभयारण्यात पावसाळी पर्यटन करताना धोकादायक ठिकाणी ह्यसेल्फीह्ण काढू नये. जागोजागी लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.कोरोनामुळे गेल्या वर्षी पर्यटनाचा सर्वच हंगाम पाण्यात गेला होता. पावसाळ्याचे चार महिने, तसेच काजवा महोत्सवदेखील झाला नव्हता. यावर्षी किमान पावसाळ्याच्या हंगामात पर्यटनामुळे स्थानिकांना लाभ होण्यास मदत होणार आहे. रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होईल. वनखात्याने अभयारण्यांमध्ये परवानगी दिल्याने धबधबे बघण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे, तसेच अजून आठवडाभर काजव्यांची चमचमही अभयारण्यात अनुभवायास येऊ शकते.-केशव खाडे, गाईड, भंडारदरा.
आजपासून अभयारण्यांचे द्वार ‘अनलॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 11:18 PM
नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अंमलबजावणीच्या अटीवर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.
ठळक मुद्देवन्यजीव विभागाची घोषणा : नांदूर-मध्यमेश्वर, कळसूबाई, यावल, अनेर डॅमचे द्वार खुले