लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : एरवी सर्वसामान्य नागरीकांच्या वस्तूंची चोरी करणाºया भुरटया चोरटयांनी आता तर थेट महापालिकेच्या मालमत्तेवर वक्रदृष्टी फिरविली असुन चोरटयांनी मखमलाबाद येथिल महापालिकेच्या मानकर उद्यानातून पहाटेच्या सुमाराला तीन चंदनाची झाडे कटरच्या सहाय्याने तोडत चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहूल खांदवे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत माहीती अशी की, मखमलाबाद शिवारात महापालिकेचे मानकर उद्यान असुन या उद्यानात प्रशासनाने काही दिवसांपुर्वी चंदनाची झाडे लावलेली होती. बुधवारी (दि. २६) पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरटयांनी उद्यानात प्रवेश करून तीन झाडे बुंध्यापासून कापून नेत चोरी केली आहे. सकाळच्या सुमाराला काही नागरीक उद्यानात गेल्यानंतर झाडे चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी प्रभागाचे नगरसेवक पुंडलिक खोडे यांना माहीती कळविली. या घटनेनंतर मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहूल खांदवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून चंदनाची झाडे चोरून नेल्याबाबत म्हसरूळ पोलीसात धाव घेतली होती.परिसरात दाट लोकवस्ती असतांना चोरटयांनी मनपाच्या उद्यानात जाऊन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या भागात म्हसरूळ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांची रात्र गस्त नियमित होत नसल्याने भुरटया चोरटयांना वाव मिळत असल्याची तक्रार परिसरातील नागरीकांनी केली आहे. इतरवेळी नागरीकांच्या वस्तू चोरणाºया चोरटयांनी आता तर थेट मनपाच्या मालमत्तेची चोरी केल्याने खळबळ उडाली आहे.
मनपाच्या उद्यानातून ३ चंदनाच्या झाडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:10 PM