नाशिकरोड : शिक्षक मतदारसंघावर नेहमीच टीडीएफचे वर्चस्व राहिले असून, नाशिक विभागाच्या मतदारसंघासाठी टीडीएफतर्फे ज्यावेळी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली त्यावेळी पुणे येथे झालेल्या बैठकीत संदीप बेडसे यांच्या उमेदवारीला १९ पैकी १८ सदस्यांनी पाठिंंबा दर्शविला होता. त्यामुळे बेडसे हेच टीडीएफचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा राज्य अध्यक्ष विजय बहाळकर यांनी केली.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात टीडीएफच्या वतीने संदीप बेडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उत्सव मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी मेळावा पार पडला. त्यावेळी बहाळकर यांनी ही घोषणा केली. पुणे येथे टीडीएफच्या बैठकीत उमेदवार ठरविण्यासाठी फिरोज बादशाह यांनाही विशेष निमंत्रित करण्यात आले होते. परंतु त्यांनी लग्नाचे कारण दाखवून बैठकीस येण्यास नकार दिला अन्यथा त्याचवेळी त्यांनाही बेडसे यांची पाठराखण करावी लागली असती, असेही बहाळकर यांनी सांगितले.शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षणक्षेत्राशी संबंधित व्यक्तीलाच आमदार म्हणून पाठविण्याची गरज असून, शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची गरज असतानाही भाजपा-सेना युती शासन भरती करू देत नसल्याचा आरोप जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी केला आहे.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, जे. यू. ठाकरे, टी. एफ. पवार, टीडीएफ अध्यक्ष विजय बहाळकर, हिरालाल पगडाळ, राजेंद्र डोखळे, पुरुषोत्तम रकिबे, दशरथ जारस, एस. बी. शिरसाठ, हिरामण शिंदे, सखाराम जाधव, के. के. अहिरे, रंजन ठाकरे, गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, नानासाहेब महाले, मनोहर बोराडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यानंतर समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत संदीप बेडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
संदीप बेडसे हेच टीडीएफचे उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:43 AM
नाशिकरोड : शिक्षक मतदारसंघावर नेहमीच टीडीएफचे वर्चस्व राहिले असून, नाशिक विभागाच्या मतदारसंघासाठी टीडीएफतर्फे ज्यावेळी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली त्यावेळी पुणे येथे झालेल्या बैठकीत संदीप बेडसे यांच्या उमेदवारीला १९ पैकी १८ सदस्यांनी पाठिंंबा दर्शविला होता. त्यामुळे बेडसे हेच टीडीएफचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा राज्य अध्यक्ष विजय बहाळकर यांनी केली.
ठळक मुद्देविजय बहाळकर : टीडीएफ मेळाव्यात दावा