नाशिक : राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खासगी क्लासेसचालकांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या विधेयकामुळे खासगी क्लास संचालकांना शिक्षण क्षेत्रात आणखी बळ मिळून त्यांची कार्यशक्ती वाढणार आहे. परंतु वाढत्या कार्यशक्तीसोबतच विद्यार्थ्यांप्रती खासगी क्लासेसचालकांच्या जबाबदाऱ्याही वाढणार असल्याचे प्रतिपादन संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा यांनी केले आहे. राज्य शासनाने कच्चा मसुद्यात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले बदल स्वीकारण्यात आल्यानंतर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे (पीटीए) संदीप विद्यापीठात रविवारी (दि. ८) राज्यस्तरीय स्नेहमेळाव्यात खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाºया कोचिंग क्लास संचालकांचा भीष्माचार्य पुरस्कार व सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, प्रा. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. संदीप झा म्हणाले, खासगी क्लासेसचा व्यावसाय असंघटित आणि अनियंत्रित होता. परंतु, या विधेयकामुळे क्लासचालकांच्या व्यावसायाला शासकीय मान्यता मिळणार आहे. परंतु, क्लासचालकांनी आणि शिक्षकांनी काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान व शिकविण्याचे तंत्र आत्मसात करण्याचे आवाहनही संदीप झा यांनी केले. दरम्यान, सरकार खासगी क्लासचालकांच्या पाठीशी उभे असून, खासगी क्लासचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांनी क्लासचालकांच्या स्नेहमेळाव्यात दिले. शाळा महाविद्यालयांमधील शिक्षक क्लासेसमध्ये नोकरी करतात अथवा क्लासेस चालवितात त्यांना नियंत्रित करण्यासाठी शिकवणी विधेयक आणल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पीटीएचे राज्यभरातील सदस्य व विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. प्रास्ताविक पीटीएचे राज्याध्यक्ष बंडोपंत भूयार यांनी केले. सूत्रसंचालन अशोक देशपांडे, जयंत मुळे, लोकेश पारख यांनी केले. क्लासचालकांच्या स्नेहमेळाव्यात नाशिकच्या यशवंत बोरसे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील जगदीश वालावलकर, रणजित जाधव, राजगोंडा पाटील, तानाजी चव्हाण, वैजिनाथ खोसे, राजन जगताप, प्रवीण ठाकूर, सतीश नरहरे, तुकाराम मुरुडकर, विश्वंभर काठवटे, पंकज भोंगाडे, राजेंद्र भोसले, संतोष भळगट, भगवंत पाळवंदे, चंद्रकांत पराडकर, नंदलाल गादिया, रवींद्र दारव्हटकर, सुधीर यावलकर, वामन पवार, रतनलाल कोटेचा, अशोक देशमुख, नरेंद्रसिंग काछवाये, किशोर पारखे, मोहन गंधे यांना कोचिंग क्लासेस क्षेत्रात प्रदीर्घ योगदानासाठी भीष्माचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर सीमा भट्टड, वनिता मोहिते, रेणुका बंगाले, रेणुका बारसल्ले, कमोदिनी वाडेकर व मीनाक्षी फडके या महिला संंचालकांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले.
संदीप झा : कोचिंग क्लासेस संघटनेच्या मेळाव्यात प्रतिपादन; भीष्माचार्य, सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान खासगी शिकवणी विधेयक स्वागतार्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:31 AM
नाशिक : राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खासगी क्लासेसचालकांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
ठळक मुद्देयोगदान देणाºया संचालकांचा भीष्माचार्य व सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानसरकार खासगी क्लासचालकांच्या पाठीशी उभे