नाशिक : संदीप फाऊंडेशनच्या संदीप पॉलिटेक्नीक यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यातील सामंजस्य करारा नुसार शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ मध्ये होणाऱ्या टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामसाठी यांत्रिकी विभागातील २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. टोयोटा टेक्नीकल एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टोयोटाच्या विविध डिलर्सशीप मध्ये सर्विस अॅडव्हाइजर या पदासाठी अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. संदीप पॉलिटेक्नीक येथे शैक्षणिक वर्ष २०१५-२०१६ पासून यंत्र अभियांत्रिकी विभागात अत्याधुनिक प्रशिक्षण प्रयोगशाळा टोयोटा कडून उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत दरवर्षी २० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना कंपनी आणि महाविद्यालयातर्फे प्रशिक्षीत केले जाते. आतापर्यंत एकूण ६० विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाºया सर्व विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे प्लेसमेंटची संधी देण्यात येवून त्यापैकी आतापर्यंत ३३ विद्यार्थ्यांना टोयोटाच्या विविध शोरूम्स मध्ये सर्विस अॅडव्हाइजर म्हणून सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये भुषण मालपुरे, विकास वाकळे, राज भालेराव, अजिंक्य नाजन, अलियन चनेगांव, संकेत गिते, सागर पाटील, राज आरोटे, शुभम रकिबे, निशांत राणे, हर्षल महाजन, सुयोग पवार, विकी गोपलानी, चैतन्य जगताप, राहुल अहिरराव, मनिष कदम, शुभम शिरसाठ, किरण बावस्कर, रोहन दिक्षीत आणि दर्शन जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संदीप पॉलिटेक्नीकच्या २० विद्यार्थ्यांची टोयोटा टेक्नीकल एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:47 PM
संदीप फाऊंडेशनच्या संदीप पॉलिटेक्नीक यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यातील सामंजस्य करारा नुसार शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ मध्ये होणाºया टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामसाठी यांत्रिकी विभागातील २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
ठळक मुद्देसंदीप पॉलिटेक्नीक -टोयोटा किर्लोस्कर मोटर्स सामंजस्य करारसंदीप पॉलिटेक्नीकच्या २० विद्यार्थ्यांची टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड