इगतपुरी : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीप वाजेचा मावस भाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के यास प्राप्त पुराव्यांच्या आधारे बुधवारीच सायंकाळी अटक केली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.सुर्वणा वाजे खून प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी म्हस्के याला अटक केली. वाडीवऱ्हे पोलिसांनी म्हस्के यास गुरुवारी (दि.१७) दुपारी ३ वाजता इगतपुरी न्यायालयात हजार केले. यावेळी संशयित आरोपी त्यांचे वकील व सरकारी वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला. यशवंत रामचंद्र म्हस्के हा संदीप वाजे याचा मावसभाऊ आहे, तर हत्या झाली त्यादिवशी दोन्ही संशयित आरोपींचे मोबाईलवरून बारा वेळेस संभाषण झाले आहे. तर, मयत डॉ. सुवर्णा वाजे आणि दोन्ही संशयितांचे लोकेशन विल्होळी परिसरात आढळले आहे. यावेळी इगतपुरी न्यायालयाने डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाचा पोलीस तपासकामी म्हस्के याला २३ फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली.
संदीप वाजेच्या मावस भावाला सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 12:37 AM
इगतपुरी : मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे ...
ठळक मुद्देइगतपुरी : सुवर्णा वाजे हत्याकांडातील दुसरा संशयित : चौकशी सुरू