मनेगाव ग्रामपंचायतीची ११ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक यादव यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली.
सरपंचपदासाठी सौ. संगिता योगेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपसरपंचपदासाठी छबूराव भोजणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी शिंदे व भोजणे यांचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप जेडघुले, सुनिता सोनवणे, कविता आंबेकर आदि सदस्य उपस्थित होते. ११ पैकी ७ सदस्य उपस्थित होते. ४ सदस्य गैरहजर राहिले. सरपंचपदी शिंदे व उपसरपंचपदी भोजणे यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
फोटो : २६ मनेगाव सरपंच (फोटो आलेला नाही)
सिन्नर तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. संगिता योगेश शिंदे तर उपसरपंचपदी अॅड. छबूराव भोजणे यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी जल्लोष करतांना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते.