या मोहिमेंतर्गत गावातील प्लास्टिक कचरा, पालापाचोळा मुक्त करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला.
ग्रामस्वच्छता अभियानांतर्गंत शिलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्यांनी सकाळी एकत्र येऊन झाडू, खराटे, टोपल्या आणून संपूर्ण गावातील गल्लीबोळातून साफसफाई केली. यावेळी महिन्यातून एकदा स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. या मोहिमेत सहभागी झालेल्यांना ग्रामपंचायतीतर्फे प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी सरपंच मंदाबाई गांगुर्डे, उपसरपंच रमेश कहांडळ, ग्रामपंचायत सदस्य दुर्गा बोराडे, योगिता कहांडळ, लीलाबाई कहांडळ, रेश्मा बर्वे, शैला कहांडळ, पवन कहांडळ, छगन कहांडळ, ग्रामसंघाच्या सदस्य जिजाबाई मोरे, सविता कहांडळ, हरिश्चंद्र बोराडे, संदीप बर्वे, बबन कहांडळ, पवन कहांडळ, संकेत कहांडळ, संदीप बोराडे, बाळु बोराडे, दिनेश दोंदे, अनिल कापसे उपस्थित होते. (फोटो ०६ शिलापूर)