पंचवटी : दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर येथे गुरु वारी (दि.८) सांज पाडव्याच्या निमित्ताने गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाचे सांज पाडव्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी याकार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर्षी इंटरनॅशनल म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या उमेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल सजविली. गायक संतोष जोंधळे, अतुल निकम, गायिका अॅना कांबळे, कृष्णा शरण आणि गौरी कुलकर्णी यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सुमधुर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रशांत महाले यांनी (किबोर्ड), फारुख पिरजादे (ढोलकी), उमेश खैरनार (आॅक्टो पॅड), नीलेश सोनवणे (गिटार), तर सतीश पेंडसे (तबला) यांनी साथसंगत केली. प्रिन्स जॉनी यांच्या मिमिक्रीने व सोनाली म्हरसळे यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्र मास रंगत आली.
गोरक्षनगर येथे रंगली सांज पाडव्याची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:08 AM