येवला : गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी यांसारख्या वाद्यांवर अवाजवी खर्च करण्यापेक्षा विविध सामाजिक उपक्रम राबवून पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.आगामी पोळा, गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहर व तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी भीमराज दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राहुल खाडे, शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, सेनेचे नेते संभाजी पवार, शहर काझी रफीऊद्दीन शेख, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विकास ताटेकोंडीलवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. येवला शहरातील वाहतुकीच्या समस्येवर नगर परिषदेने ट्रॅफिक सिग्नलसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करून येवला-विंचूर चौफुलीसह गंगा दरवाजा नाका व फत्तेबुरुज नाका येथे वाहतूक पोलिसांची २४ तास नेमणूक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘एक गाव, एक गणपती’ अंतर्गत तालुक्यातील २८ गावांतील गणेश मंडळांचा सत्कार ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेंद्र लोणारी, संतोष परदेशी, गणेश शिंदे, प्रवीण बनकर, रूपेश लोणारी, अविनाश कुक्कर, गुड्डू जावळे, प्रसाद पाटील, शहर काँग्रेसचे राजेश भंडारी, झुंजार देशमुख, वाल्मीक गोरे, राजेंद्र परदेशी, दिनेश परदेशी, शैलेश देसाई, समीर समदडिया, अक्षय राजपूत, आलमगीर शेख, एजाज शेख उपस्थित होते.
सामाजिक उपक्रम राबवावेत संजय दराडे : येवल्यात गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:48 PM