विरगाव गणाच्या संचालिका सुनीता देवरे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक महेश भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची विशेष सभा घेण्यात आली. देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित सभापती देवरे यांचा मावळते सभापती सुनीता देवरे यांच्या हस्ते शाल ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशासनातर्फे सचिव भास्करराव तांबे, ब्राह्मणगाव गटाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव यांनी स्वागत केले. नवनिर्वाचित सभापती देवरे, मावळते सभापती सोनवणे, संचालक संजय देवरे, नरेंद्र अहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपसभापती प्रभाकर रौंदळ, ज्येष्ठ संचालक श्रीधर कोठावदे ,मधुकर देवरे, तुकाराम देशमुख, पंकज ठाकरे, प्रकाश देवरे, सरदारसिंग जाधव, जयप्रकाश सोनवणे, संजय बिरारी, संदीप साळी, केशव मांडवडे, रत्नमाला सूर्यवंशी, वेणूबाई सोनवणे यांच्यासह वीरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, मुन्ना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
===Photopath===
120321\12nsk_29_12032021_13.jpg
===Caption===
सटाणा बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर संजय देवरे यांचा सत्कार करतांना जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव. समवेत प्रभाकर रौंदळ, सुनीता देवरे, नरेंद्र अहीरे, संजय देवरे, श्रीधर कोठावदे, पंकज ठाकरे, सरदार सिंग जाधव, रत्नमाला सुर्यवंशी, वेणूबाई माळी, संदिप साळे आदी.