शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

सिन्नरच्या उपनगराध्यक्षपदी संजय नवसे

By admin | Published: December 17, 2015 11:46 PM

सिन्नरच्या उपनगराध्यक्षपदी संजय नवसे

सिन्नर : माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे संजय राधाकिसन नवसे यांची सिन्नरच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पालिका कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीला आमदार राजाभाऊ वाजे गटाचे नगरसेवक अनुपस्थित राहिले.नामदेव लोंढे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत नगरसेवकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदासाठी नवसे यांच्या चार उमेदवारी अर्जाव्यतिरिक्त अन्य अर्ज दाखल न झाल्याने नवसे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. बैठकीस नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, मावळते उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक बापू गोजरे, मेहमूद दारूवाला, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, सुजाता गाडे, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, उज्ज्वला खालकर, शीतल कानडी, लता मुंडे, लता हिले, मंगला जाधव उपस्थित होते. नवसे यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच कोकाटे समर्थकांनी जल्लोष केला. याप्रसंगी नवसे व लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, जिल्हा परिषद सदस्य राजेश नवाळे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे यांनी नवसे यांचा सत्कार केला. त्यानंतर नवसे यांची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. (वार्ताहर)