दरवर्षी निवृत्तिनाथांची पालखी पायी दिंडीने पंढरपूरकडे अहमदनगरमार्गे मार्गस्थ होत असते. अहमदनगर मुक्कामीच नाथांचा संजीवन सोहळा धूमधडाक्यात साजरा होण्याची परंपरा आहे. यंदाही शासनाने पायी वारीस परवानगी नाकारल्याने संजीवन सोहळा त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातच साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिरात सकाळी महापूजा झाल्यानंतर देवस्थानचे पारंपरिक पुजारी ह.भ.प.जयंत महाराज गोसावी यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन
महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कोविडचे नियम पाळून हा सोहळा साजरा केला जाणार आहे.
इन्फो
दरवर्षी पालखी दरमजल करत ज्येष्ठ कृ. एकादशीला अहमदनगर येथे पोहोचत असते. पायी दिंडी सोहळ्याच्या २२ दिवसीय कार्यक्रम पत्रिकेत संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे आयोजन अहमदनगर येथे होईल, असे नमुद केलेले असते. अहमदनगर येथे रात्रभर भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होऊन पालखी पुढे मार्गस्थ होत असते. यंदाही या सोहळ्याला नगरकर मुकणार असून संजीवन समाधी सोहळा मंदिरातच साजरा होणार आहे. दरम्यान, यावर्षी १९ जुलै रोजी पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरकडे जाणार असून त्याची तयारी सुरू आहे.
फोटो- ०४ त्र्यंबकराजा
040721\04nsk_28_04072021_13.jpg
फोटो- ०४ त्र्यंबकराजा