शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

‘संक्रांत’ : नायलॉन मांजाने पाच वर्षीय बालिकेचा नाशिकमध्ये कापला गेला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 8:54 PM

नायलॉन मांजाच्या वापरामुळे लहान बालकांपासून तर प्रौढापर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर तर वर्षभर या मांजारुपी जाळ्याची ‘संक्रांत’ कायम असते. मकरसंक्रांतीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही शहरासह विविध उपनगरांमध्येतरुणांकडून पतंगबाजी सुरू झाली आहे

ठळक मुद्देसर्रासपणे पतंग-मांजा विक्रीच्या दुकानांमधून मांजा लोकांच्या हाती पर्यावरणपुरक अशी सुरक्षित संक्रांत साजरी करण्याचा संकल्प करण्याची गरज

नाशिक : आईसोबत दळण घेण्यासाठी संध्याकाळी बाहेर पडलेल्या एका बालिके चा गळा नायलॉन मांजाने कापला गेल्याची घटना रविवारी (दि.२६) सिडको परिसरात घडली.सिडको भागातील गणेश चौकामध्ये राहणा-या पाटील कुंटुंबातील पाच वर्षाची कल्याणी ही आईसमवेत संध्याकाळी घराबाहेर पडली. यावेळी अचानकपणे पतंगचा मांजा तूटून खाली आला असता तीच्या गळ्याभोवती आवळला गेला. सदर मांजा नायलॉनचा असल्यामुळे कल्याणीच्या गळ्याला जखम झाली. सदर बाब सोबत असलेल्या आईच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ मांजा बाजूला काढला यामुळे अनर्थ टळला व जखम जास्त खोलवर झाली नाही. मात्र नायलॉन मांजाच्या वापरामुळे लहान बालकांपासून तर प्रौढापर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर तर वर्षभर या मांजारुपी जाळ्याची ‘संक्रांत’ कायम असते. मकरसंक्रांतीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही शहरासह विविध उपनगरांमध्येतरुणांकडून पतंगबाजी सुरू झाली आहे. यावेळी पतंग कापली जाऊ नये म्हणून सर्रासपणे नायलॉन मांजा संबंधितांकडून वापरला जात असल्यामुळे दुर्घटनांना निमंत्रण मिळण्यास सुरूवात झाली आहे. शहरात नायलॉन मांजाने जखमी होण्याची पहिली घटना रविवारी गणेश चौकामध्ये घडली. नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे पतंग-मांजा विक्रीच्या दुकानांमधून मांजा लोकांच्या हाती पडत आहे. नागरिकांनी याबाबत जागरूकता दाखवून नायलॉन मांजा न वापरता पर्यावरणपुरक अशी सुरक्षित संक्रांत साजरी करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. नायलॉन मांजाला मागणी कमी झाल्यास आपोआप विक्रीदेखील बंद होईल, हे लक्षात घेता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजा हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वनविभाग, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनासह पर्यावरणप्रेमी संघटनांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात