शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

जैन संस्कृती रक्षणासाठी संस्कार प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:19 AM

नाशिक : सामाजिक नीतिमूल्ये आणि कुटुंबातील संवाद तसेच संस्कार हरवत चालल्याने येणाºया पिढी समोर कोणतेच आदर्श राहणार नाही. जैन समाजात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे अनेक मौलिक संस्कार सांगण्यात आले आहेत. कुटुंब संस्कारक्षम झाले तरच पुढची पिढी संस्कारक्षम घडेल, असे विचार मान्यवरांनी मांडले. रविवार कारंजा येथील जैन स्थानकात झालेल्या संस्कार ...

नाशिक : सामाजिक नीतिमूल्ये आणि कुटुंबातील संवाद तसेच संस्कार हरवत चालल्याने येणाºया पिढी समोर कोणतेच आदर्श राहणार नाही. जैन समाजात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे अनेक मौलिक संस्कार सांगण्यात आले आहेत. कुटुंब संस्कारक्षम झाले तरच पुढची पिढी संस्कारक्षम घडेल, असे विचार मान्यवरांनी मांडले. रविवार कारंजा येथील जैन स्थानकात झालेल्या संस्कार प्रदर्शनप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.जैनत्व सुरक्षा संघ आणि ‘लुक अ‍ॅन्ड लर्न’ या संस्थांच्या माध्यमातून जैन स्थानकात संस्कार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्म टिकावा आणि या धर्मातील संस्कार मुलांमध्ये रुजावे याबरोबरच कुटुंबव्यवस्था टिकविण्यासाठी जैनत्व सुरक्षा समितीच्या माध्यमातून शहरातील जैन बांधवांशी संवाद साधण्यात आला. जैन समाजात अनेक संस्कार सांगितले आहेत; याच संस्काराची आठवण करून देण्यासाठी रविवार कारंजा येथील स्थानकात प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जीवनातील प्रत्येक घटना आणि प्रसंगाचा संबंध माणसाच्या आयुष्याशी जोडलेला असतो. परंतु जाणते किंवा अजाणतेपणाने ही मूल्ये विसरली जातात. या मुल्यांची आठवण करून देण्यासाठी जैन समाजातील काही तरुण पुढे आले आणि त्यांनी देशभार जैन संस्कार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम सुरू केले आहे. खेळ आणि मनोरंजनाच्या साधनांचा वापर करून मुलांना संस्कारक्षम बनण्याचा प्रयत्न या समितीने सुरू केला होता. यामध्ये मुंबईपासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंतचे कार्यकर्ते काम करीत आहेत.जेवणाची शास्त्रीय पद्धत कशी आहे, मोबाइलचा वापर किती आणि कसा करावा, लहान मुलांच्या मानसिकतेवर मोबाइल गेमचा होणारा परिणाम याची माहिती देण्याबरोबरच सहप्रयोग सांगण्यात आली. प्राणी आणि पाणी यांचे जीवनातील महत्त्व सांगताना पाण्याचा वापर जपून कसा करावा याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात करण्यात आले. रात्री झोपताना देवाचे नामस्मरण करताना झालेल्या चुकांची माफी आणि पुढचा दिवस चांगल्या विचाराने सुरू व्हावा, अशी प्रार्थना करण्याचे महत्त्व आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. जैन संस्कृती वाचविण्याची मोहीमजैन संस्कृती जीवन जगण्याची संयमी परंपरा आहे. या परंपरेचे पालन करून येणारी पिढी अधिक सक्षम करण्यासाठी आगोदर कुटुंबाने जैन संस्कार जपला पाहिजे. तेच संस्कार त्यांनी आपल्या मुलांना दिले पाहिजे. यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. खरे जैन बनण्यासाठी आणि जैनत्वाची रक्षा करण्यासाठी जैन संस्कार शिकविला जात आहे. याचसाठी ही मोहीम सुरू आहे.- श्रेयांस छाजेड, मार्गदर्शकनाशिकमधील ६६ वे प्रदर्शनजैनत्व सुरक्षा संघामध्ये बहुतांश प्रचारक हे चार्टर्ड अकौंटंट असून, त्यांनी ही मोहीम खांद्यावर घेतली आहे. श्रेयांस छाजेड, आनंद कटारिया, सुरजमल सांड, संकेत ओसवाल, सुरभीबहेन छाजेड हे तरुण कार्यकर्ते जैन संस्काराचा प्रचार करण्यासाठी देशभर फिरत आहेत. नाशिकमधील हे त्यांचे ६६ वे प्रदर्शन होते. सुमारे दीड वर्षापूर्वी चेन्नई येथून या मोहिमेला सुरुवात झाली आहे.