शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी : तुकाराम गाथा पारायणाची सांगता; महाप्रसादाचे वाटप; हरसूलमध्ये दिंडी

By admin | Published: December 21, 2014 11:17 PM

जिल्ह्यात पालखी मिरवणूक उत्साहात

नाशिक : तेली समाजाचे वैभव संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा ३१५ वी पुण्यतिथी सोहळा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तुकारामगाथा पारायण सप्ताह, गीता पाठ वाचन आदी कार्यक्रम संपन्न झाले. या निमित्ताने ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. येवला : शहरात विविध खेळांचे प्रात्यक्षिक करीत पारंपरिक हलकडी, डीजेचा नाद व बॅण्ड पथक यांच्या घोषात संताजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. शनिवार दि. १३ ते २० डिसेंबरदरम्यान येवला येथे समस्त तेली समाजाच्या वतीने पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याची सुरुवात श्री तुकारामगाथा पारायण व प्रवचनाने झाली. सप्ताहात डॉ. प्रसाद कुलकर्णी ,निवृत्तीभाऊ गोंठला, प्रा. राजाराम बिन्नर, प्रा. सुरेंद्र ठोकणे, प्रा. शरद ढोमसे, दूरसंचार अधिकारी अविनाश पाटील, मधुकर खंडाळकर, आळंदीचे हरिदास महाराज यांची प्रवचने झाली. मधुकर सोनवणे यांनी तुकाराम गाथा पारायण केले. त्यांना कचरू गाडेकर, सुभाषराव दाभाडे, अर्जुन क्षीरसागर, नाना महाराज घोगते, सुनंदा सोनवणे, सुमनबाई लुटे, ताराबाई मगर, शांताबाई काळे, सत्यभामा थोरात यांनी साथ दिली. सप्ताहात दररोज दुपारी गीता पाठ वाचन झाले. यात सौ. डूंबरेताई यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री सोनवणे, मीना लुटे, नंदाबाई घाटकर, सुमनबाई दाभाडे, संगीता सोमवंशी, संगीता दिवटे, यांच्यासह ५४ महिला सहभागी झाल्या होत्या. शनिवारी संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी संताजी महाराजांची भव्य पालखी, फुलांनी सजवलेल्या टॅ्रक्टरवर विठ्ठल व संताजी महाराजांची प्रतिमा होती २ अश्व असलेला चांदीच्या रथात संताजी महाराजाच्या भूमिकेत श्याम कृष्णा मगर व संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत रंगनाथ लुटे होते.कीर्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी टिपरी नृत्य सादर केले. संगीताच्या ठेक्यावर थिरकणारा विद्युत रोषणाई केलेला अरुण गांगुर्डे यांचा घोडा शहरातील चौका-चौकात नाचवला गेला. संताजी महिला ब्रिगेडच्या कार्यकत्यांनी मिरवणुकी दरम्यान लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवले. महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला. संचालन सूर्यकांत महाले यांनी केले. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी विठ्ठल लुटे, बंडू क्षीरसागर, अनिल साळुंके, योगेश सोनवणे, अशोक सोमवंशी, कृष्णा क्षीरसागर, सागर रायजादे, राजेंद्र दिवटे, सदानंद बागुल, शशिकांत मोरे, महेंद्र रायजादे, यांच्यासह संताजी सेनेच्या कार्यकत्यांनी विशेष परिश्रम घेतले.विंचूरला उत्साहविंचूर : तेली समाजबांधवांच्या वतीने येथील शनैश्चर मंदिरात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शनैश्चर महाराज व संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी तेली समाजाचे अध्यक्ष कैलास सोनवणे, बाळासाहेब नेवगे, सोमनाथ शिरसाठ, कैलास नेवगे, विष्णुपंत काळे, शिवाजी क्षीरसागर, उत्तम नेवगे, सुभाष शिरसाठ, बाळकृष्ण काळे, रघुनाथ शिरसाठ, मधुकर सोनवणे, जगन्नाथ शिरसाठ, दिलीप कोरडे, भारत महाले, गोकुळ शिरसाठ, जितेंद्र क्षीरसागर, संतोष सोनवणे आदिंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे तेली समाजाच्या वतीने संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी जय योगेश्वर मंगल कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कायक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक वसंत कचरू देसाई हे होते. येथील मेनरोडवरील चौकाचे संताजी महाराजचौक म्हणून नामकरण करण्यात आले. गावात भव्य पालखी मिरवणूक काढण्यास आली महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.हरसूलमध्ये दासबोध ग्रंथाची दिंडीहरसूल : येथे संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दासबोधाचे पारायण करण्यात आले होते. ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याने सांगता करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बापू बाबा देवरगावकर, वसंतराव कर्डिले , हरिचंश्द्र देसाई, सदूभाऊ वालझाडे, संतोष कदम, नगरसेवक त्र्यंबकेश्वर राजेंद्र देसाई, सचिन कदम, नितीन कस्तुरे, सोपान कीर्तीकर उपस्थित होते. बापू बाबा महाराज देवरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दासबोध पारायणाचे वाचन संताजी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळी संताजी महाराजच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी ग्रंथाची दिंडी व चिमुकल्या मुली व सुवासिनींनी मंगल कलशासह सामील झाल्या होत्या. हरसूल व परिसरातील अनेक वारकरी भजनी मंडळासह अभंग गात ग्रंथ दिडीचे सडा रांगोळीने स्वागत करण्यात आले . बापू बाबा देवरगावकर यांचे ठीक-ठिकाणी औक्षण करण्यात आले मेनरोड , भाजी बाजार, आंबेडकर चौक, मज्जीद चौकमार्गे हनुमान मंदिराच्या प्रांगणात ग्रंथदिंडीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी हरसूलसह परिसरातील अनेक वारकरी भजनी मंडळ, तेली समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संताजी महाराज व दासबोध ग्रंथाचे हनुमान मंदिराच्या आवारात स्वागत करण्यात आले. यावेळी बापू बाबा देवरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीपोत्सव करण्यात आला. मान्यवराच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंत कर्डिले, सदूभाऊ वालझाडे, संतोष कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करत संताजी महाराज यांच्या कार्याची माहिती करून दिली. हरसूल ग्रामपंचायतमध्ये नव्याने निवडून आलेले भारती व्यवहारे व योगेश देवरगावकर तसेच हरसूल विश्व हिंदू परिषदच्या शहर अध्यक्षपदी कपिल देवरगावकर यांची निवड झाल्याबद्दल तर भारतीय सैन्य दलातील अमोल मोरे या सैनिकाचा काश्मीर येथील बंदिपुरा या चकमकीत सहभागाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. त्यानंतर बापू बाबा देवरगावकर यांच्या मधुर वाणीतील कीर्तनने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . यावेळी तेली समाजाचे संस्थापक अध्यक्ष कै. दत्तात्रय वाघचौरे, कै. रामदास कस्तुरे, कै. सुशीला देवरगावकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमााचे प्रस्ताविक सुरेंद्र देवरगावकर यांनी केले. सूत्रसंचालन अभिषेक गाडगीळ यांनी केले. यावेळी प्रवीण कोरडे संजय मोरे संताजी मंडळाचे अध्यक्ष रविकाका देवरगावकर उपाध्यक्ष कांतीलाल लोखंडे, शांताराम देवरगावकर, युवक मंडळाचे अध्यक्ष संतोष कस्तुरे, उपाध्यक्ष संजय बागडे, सचिव संतोष गाडगीळ आदि उपस्थित होते. पुण्यतिथी सोहळा यशस्वितेसाठी सुरेंद्र देवरगावकर, सौ कांताबाई घोंगे, रमेश व्यवहारे, मोहन वाघचौरे, बाळासाहेब गाडगीळ, अरु ण देवरगावकर, भगवान बारगजे, रामेश्वर देवरगावकर, नीलेश देवरगावकर, प्रशांत वाघचौरे आदिंसह युवक मंडळाने परिश्रम घेतले. (वार्ताहर)