बलसाड रोडवरील विठ्ठल मंदिरात नगराध्यक्ष मनोज घोंगे, सभापती विलास अलबाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल राऊत, तुळशिराम वाघमारे, कुमार मोंढे, श्याम गावित, गणेश शिरसाठ, भागवत पाटील, छगन चारोस्कर, रामदास शिरसाठ, राजू कर्पे, संदीप शिरसाठ, रघुनाथ चौधरी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
‘स्वप्नांचा पाठलाग’ शॉर्टफिल्म प्रदर्शित
पेठ -दिव्यांग विद्यार्थ्याची यशोगाथा दर्शवणारा बलराम माचरेकर निर्मित ‘स्वप्नांचा पाठलाग’ ही शॉर्ट फिल्म आपली आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. शिक्षकाच्या सामाजिक मदतीतून दिव्यांग विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिल्याची यशोगाथा यामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. यावेळी खंडेराव डावरे, बलराम माचरेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
कडवईपाडा येथे माकडाचा धुमाकूळ !
पेठ -जंगलात पाण्याचे झरे आटू लागल्याने जंगली प्राण्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळवला असून, पेठ तालुक्यातील कुळवंडीपैकी कडवईपाडा येथे एका जंगली माकडाने गावभर धुमाकूळ घातला. घरांसमोर हजेरी लावत भेटेल ते खाऊन माकड गावभर फिरले, यामुळे बालगोपाळांची मात्र चांगलीच करमणूक झाली.
रूईपेठा शाळेने टाकली कात
पेठ - तालुक्यातील रूई पेठा येथील जिल्हा परिषद शाळेचे बाह्यांग व अंतरंग शेवखंडी येथील चित्रकार ज्ञानू गावित व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कलाकुसरीतून विविध रंगांनी सजवण्यात आले असून, यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. सध्या शाळा बंद असल्याने गावागावात शाळांच्या रंगरंगोटीची कामे सुरू केली आहेत.
गावंधपाडा येथे भात काढणी प्रात्यक्षिक
पेठ - तालुक्यातील गावंधपाडा येथे वनराज फॉर्मर्स प्रोसेसिंग कंपनीच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना भात काढणी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, वनराजचे अध्यक्ष एकनाथ गावंडे, मंडल कृषी अधिकारी मुकेश महाजन यांच्यासह संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते.