घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील आकाश पांडुरंग गिते (22) या सर्पिमत्राचा विषारी सापाने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला.तळोशी या अतिदुर्गम गावातील आकाश हा चार-पाच वर्षांपासून सर्पिमत्र म्हणून काम करत असताना अनेक विषारी जातीचे साप पकडून ते जंगलात सोडले होते काल सायं पाच वाजेच्या सुमारास गिरेवाडी येथे शेतात काम करत असताना नाग या जातीचा सर्प आढळून आला असता त्याने हा पकडला मात्र चपळ असणार्या नागाने आकाशच्या कानाच्या वर चावा घेतला व पसार झाला थोड्याच वेळात आकाशला चक्कर यायला लागली त्याच्या मित्राने लागलीच ग्रामीण रु ग्णालय इगतपुरी येथे उपचारासाठी दाखल केले मात्र तब्बेत जास्त बिघडल्याने डॉक्टरांनी जिल्हा रु ग्णालय नाशिक येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला मात्र नाशिक जिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे तळोशीसह परिसरावर शोककळा पसरली आहे
तळोशी येथील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:09 AM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील आकाश पांडुरंग गिते (22) या सर्पिमत्राचा विषारी सापाने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला.
ठळक मुद्देशेतात काम करत असताना नाग जातीचा सर्प आढळून आला नाशिक येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू