नांदगाव : तालुक्यातील जळगाव बु. येथील शुभम दिनकर मेंगाळ हा १० वर्षाच्या मुलाला रात्री झोपडीच्या बाहेर खेळत असतांना अचानक घोणस सापाचा दंश झाला. साप बारीक असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. सर्पदंशाची बातमी काही मिनिटात गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी सर्प मित्र प्रभाकर निकुंभ यांना तो साप घोणस जातीचा विषारी साप असल्याचे लक्षात आले. सर्प दंश झालेला मुलगा व सापासहीत ग्रामीण रु ग्नालय गाठले. डॉ. रोहन बोरसे यांनी क्षणाचा विलंब न करता तात्काळ उपचार सुरु केले दुसºया दिवशी शुभम शुध्दीवर आला. त्याचे प्राण वाचले. सर्प दंश झाल्यावर तो लहान साप असल्याचे समजून दुर्लक्षित केल्याने शुभमच्या जिवावर बेतली होती. पण सर्प मित्र प्रभाकर निकुंभ यांनी तात्काळ उपचारासाठी दाखल केल्याने त्याचे प्राण वाचिवण्यात डॉ. बोरसे यांना यश आले .
सर्पमित्राच्या तत्परतेने वाचले मुलाचे प्राण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:45 PM