पांडाणे -साडेतिनशक्ती पिठांपैकी आद्यपिठ असलेल्या सप्तशृंगीदेवीची कोजागरी पोर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली . यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले. देवीची महापुजा सुधीर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. देवीचे पुजारी दिंगबर भोये , गोविंद केवारे ,नाना गांगर्डे ,प्रकाश कनोज विश्वनाथ बर्डे ,गौरव देशमुख ,,मिलंद राजेंद्र दिक्षित ,भाग्येश दिक्षीत, विकी दिक्षीत, पुजारी विनोद दिक्षीत घनश्याम दिक्षीत ,व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत आदी उपस्थित होते. कोजागरी पोर्णिमा असल्यामुळे नाशिक , त्र्यंबकेश्वर , असलोद , शहादा , सुरत , पेठ , सर्वतिर्थ टाकेदचे तिर्थ कावडीने आणून भगवतीला दुपारपासून भगवतीच्या स्नान करण्यास सुरवात झाली. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक गडावर हजेरी लावत असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून मंदीर गाभाऱ्यापासुन ते बाजारपेठेपर्यत बाºया लागल्या होत्या. शारदीय नवरात्र हा पहिल्या माळेपासून सुरू होणारा उत्सवाला कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी यात्रेची सांगता होते.
सप्तश्रृंगीदेवीचरणी लाखो भाविक नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 2:41 PM