नाशिक : सुवर्णकार समाजाचे आराध्य संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत नाशिक सराफ असोसिएशनतर्फे ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सराफ असोसिएशनकडून सर्व सराफ व्यावसायिक व कारागीर दिनांक १ मार्चला संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नो व्हेईकल डे’ पाळणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली आहे. सुदृढ शारीरिक आरोग्याचा संदेश देतानाच, पर्यावरणाला काही पूरक ठरू शकेल, असा उपक्रम राबविण्याच्या विचारातून नाशिक सराफ असोसिएशनने संत श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नो व्हेईकल डे’ पाळून सामाजिक जबाबदारी जोपासण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार १ मार्च रोजी दैनंदिन व्यवहारांसाठी सराफ बाजारात येताना सायकल, शक्य असल्यास पायी आणि अगदीच शक्य होत नसल्यास कोविड नियमावली पाळून शेअर रिक्षा, शेअर टू व्हिलर किंवा आपल्या रस्त्यावर राहात असलेल्या सराफ बांधवांनी येण्या-जाण्यासाठी संयुक्त वाहनाचा वापर करण्याचे आवाहन अध्यक्ष गिरीश नवसे, सचिव किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहुल थोरात, प्रमोद चोकसी, योगेश दंडगव्हाळ आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त सराफ असोसिएशनचा ‘नो व्हेईकल डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:20 AM