नाशिक : शहरातील व्यवसाय सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी आणि पोलिसांकडून मात्र नकार यामुळे व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. अनेक व्यावसायिक संघटनांनी तर आता १७ मेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातप्रामुख्याने सराफी व्यावसायिक आणि कापड पेठेतील व्यवसायांचा समावेश आहे.गेल्या २३ मार्चपासून नाशिकमध्ये लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. १४ एप्रिलपासून सर्व काही सुरळीत होईल, असे वाटत असताना केंद्र शासनाने ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला. आता यानंतर सर्व बाजारपेठा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती.जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णयदेखील घेतला होता, मात्र पोलीस खात्याने संचारबंदी तसेच रेड झोनमधील दुकाने सुरू करण्यावरील निर्बंध कायम असल्याचे स्पष्ट केल्यामुळे बुधवारी (दि. ६) शहरात अनेक ठिकाणी सुरू झालेले व्यवसाय बंद करण्यात आले.या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील सराफा असोसिएशन आणि कापड विक्रेत्यांच्या संघटनेने आता समाजहिताचा आणि शासकीय नियमांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून १७ मेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सर्व बाजारपेठा १७ मेनंतरच खुल्या होण्याची शक्यता आहे.---------जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर सकाळी स्टेशनरीचे दुकान उघडले होते, मात्र पोलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले. एका रांगेतील केवळ पाच दुकाने सुरू राहतील, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे व्यवसायांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही पोलिसांनी म. गांधी रोडवरील अनेक दुकाने बंद केली.- अतुल पवार,स्टेशनरी व्यावसायिक,महात्मा गांधीरोड, नाशिक
नाशिकमधील सराफी पेढ्या, कापडबाजार १७ मेपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 11:17 PM