कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ. विवेक कोठावदे, सचिव पदावर डॉ. गिरीश नेहेते, सहसचिव डॉ. संदीप जोशी, खजिनदार डॉ. विवेक ठाकरे, सहखजिनदार डॉ. गणेश भामरे तसेच डॉ. अतुल सोनवणे, डॉ. चारुता बापये आणि डॉ. स्वप्निल विधाते यांचा समावेश करण्यात आला. डॉ. सतीश पाटील, डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. चारुता बापये यांनी अतिथींचा परिचय करून दिला. अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. दराडे सुवर्णपदक विजेते नेत्र विकार तज्ज्ञ असून तात्याराव लहाने यांचे विद्यार्थी आहेत. ते सिन्नर व नाशिक रोड येथे गेल्या २० वर्षांपासून नेत्रविकार सेवा सेवा देत आहेत. मावळते अध्यक्ष डॉ. अतुल सोनवणे, सचिव डॉ. कल्याण चौथे आणि खजिनदार युवराज भंगाळे यांनी नूतन कार्यकारिणीकडे सूत्रे सुपूर्द केली. डॉ. लहाने यांनी वैद्यकीय सेवेतील नैतिकता, कोविड परिस्थितीतील सेवा या विषयावर डॉ. रागिणी पारख व सामूहिक वैद्यकीय सेवा या विषयावर डॉ. परीक्षित गोटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
फोटो - २५ डॉ. सारंग दराडे
===Photopath===
250521\25nsk_41_25052021_13.jpg
===Caption===
फोटो - २५डॉ. सारंग दराडे