सटाणा : शहरातील ग्राहक सहकारी संघाच्या सभापतीपदी राजेंद्र सरदार तर उपसभापतीपदी साहिल सोनवणे यांची शुक्र वारी (दि.१४) झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतीश पाटकर यांनी काम पाहिले.संघाचे मावळते सभापती प्रवीण बागड आणि उपसभापती देवेंद्र सोनवणे यांनी आवर्तनानुसार पदाचा राजीनामा दिल्याने शुक्रवारी दुपारी बारा वाजता सहाय्यक निबंधक कार्यालयात संचालकांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रि या पार पडली. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी राजेंद्र सरदार तर उपसभापती पदासाठी साहिल सोनवणे यांचा एकेकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी पाटकर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली. यावेळी सरदार व सोनवणे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. ज्येष्ठ संचालक अरविंद सोनवणे व संचालिका मंगला सोनवणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती सरदार व सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संचालक नीलेश पाकळे, किरण सोनवणे, प्रवीण बागड, देवेंद्र सोनवणे, अरु ण सोनवणे, मंगला सोनवणे आदींसह भाऊसाहेब देसले, श्रीपाद कायस्थ, दिलीप सोनवणे, बाळा बच्छाव, भारत बच्छाव, जितेंद्र पवार, सचिव दीपक अहिरे आदींसह कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.
सटाणा ग्राहक सहकारी संघाच्या सभापततिपदी सरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 6:30 PM
उपसभापतिपदी सोनवणे : रिक्त पदावर निवड प्रक्रिया
ठळक मुद्देएकेकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी पाटकर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली