एकदा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे काही कामानिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेले असताना पंचवटीतील मुठे यांच्या वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात बैठक घेतली होती. तेव्हापासून खऱ्या अर्थाने नाशिकमधील गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक राजकीय जडण घडणीत सरदार चौक मित्रमंडळाचे योगदान विशेष अधोरेखित करण्यासारखे आहे. मंडळाने नाशिकच्या समाजकारणात सदुभाऊ भोरे यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक दिले. त्यानंतरच्या काळात रमेशशेठ भोरे, संजय अदयप्रभू यांनी मंडळाची धुरा समर्थपणे पुढे नेली. मंडळाला सामाजिक, राजकीय, सिनेकलावंतांनी गणेशोत्सवात भेटी दिल्या आहेत. नाशिक गणेशोत्सवात वीस फूट उंच मूर्तीची परंपरा मंडळाने अस्तित्वात आणली. नाशिकमध्ये चलचित्र देखावे साकारण्याची सुरुवात मंडळाने केली. गणेश विसर्जन मिरवणुकीत तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी हे मर्दानी खेळ मंडळाचे विशेष आकर्षण होते.
पर्यावरण रक्षणासाठी २०१० साली गणपतीची कायमस्वरूपी मूर्ती स्थापन केली. मौल्यवान मंडळात सरदार चौक मंडळ असून गणेशाला १३ किलो चांदीची आभूषणे आहेत. शिवजयंती, रंगपंचमी, नवरात्रोत्सव, होळी, रहाड उत्सव, गणेश जयंती, साईबाबांचा भंडारा धार्मिक, महाराष्ट्र दिन, रक्तदान, आरोग्य तपासणी, अनाथ मुलांसाठी शालेय साहित्य वाटप, पूरग्रस्तांना मदतकेंद्र, वृक्षारोपण उपक्रम मंडळ राबविते. सरदार चौक मित्रमंडळ लवकरच शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. (फोटो १४ पंचवटी)