ठळक मुद्देगावविकासाच्या स्वप्नांना बळ कथक नृत्य संस्थेच्या नृत्यांगणांनी गणेशवंदना सादर केली. सरपंचांसाठी संस्मरणीय गौरव सोहळा‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन
नाशिक : ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरविणा-या आणि गावाला समृद्ध करण्यासाठी धडपडणा-या जिल्ह्यातील १३ कर्तबगार गावकारभा-यांना ‘लोकमत’च्या वतीने ‘सरपंच अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आला. ढोल ताशांचा गजर आणि तुतारीच्या निनादात मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंचांचा कौतुक सोहळा अधिकच रंगला. विशेष म्हणजे गावविकासाच्या स्वप्नांना बळ देणारे मोलाचे शब्द आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा गौरव सोहळा सरपंचांसाठी संस्मरणीय ठरला.बीकेटी टायर्स प्रस्तुत, पतंजली आयुर्वेद प्रायोजित आणि महिंद्रा टॅक्टर्स सहप्रायोजक अससलेल्या ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड २०१७’चा शानदार सोहळा हॉटेल एक्सप्रेस इन येथे पार पडला. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री विनायकदादा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस आयुक्त रविद्रकुमार सिंगल, महिंद्र ट्रॅक्टर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश ओझा, एरिया मॅनेजर हर्षद साबळे, बीकेटी टासर्यचे सहायक व्यवस्थापक जुबेर शेख, बीकेटी टासर्यचे अधिकृत वितरक, सुरेश धूत, महिंद्राचे अधिकृत वितरक उदय गोळेसव आदि मान्यवर तर प्रमुख वक्ते म्हणून बुधाजीराव मुळीक व राष्टपती पुरस्कार विजेते औरंगाबाद जिल्ह्यातील भास्करदादा पेरे उपस्थित होते.
प्रारंभी किर्ती भवाळकर यांच्या नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या नृत्यांगणांनी गणेशवंदना सादर केली. मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि बीके टायर्स तसेच पतंजली यांच्या उत्पादनांची ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. मान्यवरांचा सत्कार लोकमचे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रास्ताविकात सरपंच अॅवॉर्ड उपक्रमाची भूमिका मांडली. गावाचा प्रपंच चालविणारा आणि नवी उमेद, ऊर्जा आणि भरारी घेऊन ग्रामविकासाचे स्वप्न पाहाणारा सरपंच हा खरा गावप्रमुख असतो. सरपंच म्हणून परंपरागत जनमानसात असलेली सरपंचांची प्रतिमा आता बदलत आहे. चौदाव्या वित्त आयोगानुसार सरपंचांना निधीचा विनियोग करण्याचे अधिकार असलेला आजचा सरपंच आहे. या कर्तबगार आणि विकासासाठी झटणा-या सरपंचांचा हा गौरव सोहळा असल्याचे अग्रवाल म्हणाले. लोकमत हे केवळ वृत्तपत्र राहिले नाही तर वाचकांची चळवळ झाली आहे. लोकतने सर्वसामान्यांसाठी अनेक व्यासपीठ उपलब्द करून दिले आहेत. सरपंच अॅवार्ड हा सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. लोकमतने सुरू केलेल्या विविध पुरस्कारांच्या मालिकेत संसदेपासून ते सरपंचपदापर्यंतचा प्रवास असल्याचे अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्रामसंरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजिटल अॅवॉर्ड) पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द इअर या श्रेणींमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महिला सरपंचांचा लक्षणीय सहभाग होता.परिक्षक म्हणून वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थतज्ज्ञ गिरीधर पाटील, वीज मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता अरविंंद गडाख,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील, प्रगती अभियानच्या अश्विनी कुलकर्णी जलसिंतनचे अध्यक्ष तज्ज्ञ राजेंद्र जाधव, जलपर्यावरण अभ्यासक निशिकांत पगारे यांनी काम पहिले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी आभारप्रदर्शन केले.
पुरस्कार विजेते सरपंचसीमा शिंदे, सरपंच ठाणगाव ता. सिन्नर (जलव्यवस्थापन)चंद्रभागाबाई भोई, सरपंच तळेगाव, ता. दिंडोरी (वीजव्यवस्थापन),विनिता सोनवणे, सरपंच अंदरसूल ता. येवला (शैक्षणिक सुविधा)केदा काकुळते, किकवारी खुर्द, ता. बागलाण (स्वच्छता)भारती गायकवाड, दुगाव, ता. नाशिक (आरोग्य)जिजाबाई कुंभार, उंबरदहाड, ता. पेठ (पायाभूत सुविधा)रंजना सानप, शिवरे, ता. निफाड (ग्रामरक्षण)ललीता डोंगरे, पाथरे खुर्द ता. सिन्नर (पर्यावरण संवर्धन)मनीषा पगार, वडनेर भैरव ता. चांदवड (ई-प्रशासन)ललीता डोंगरे, पाथरे खुर्द ता. सिन्नर (रोजगार निर्मिती)सुनीता सैद, वडांगळी ता. सिन्नर (कृषी तंत्रज्ञान)डॉ. मिलींद पवार, सौदाणे, ता. मालेगाव (उदयोन्मुख नेतृत्व)दत्तात्रय पाटील, खेडगाव ता. दिंडोरी (सरपंच आॅफ द इअर)