निफाड : गावाच्या विकासासाठी राज्यातील सर्व सरपंचांनी एकत्र यावे. सरपंचांची अनेक कामे व प्रश्न घेऊन सरपंच सेवा महासंघ शासन दरबारी जाणार असून त्यासाठी राज्यातील सरपंचांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सरपंच राज्य सेवा महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील यांनी व्यक्त केले
निफाड तालुक्यातील सरपंच सेवा महासंघाची तालुका कार्यकारिणी निवडीची बैठक निफाड येथील मार्केट यार्डच्या सभागृहात संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पुरुषोत्तम घोगरे पाटील, राज्य सोशल मीडिया अध्यक्ष भाऊसाहेब कळसकर, राज्य संपर्क प्रमुख राहुल उके, रामनाथ बोराडे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे, सरपंच सेवा संघाचे जिल्हा संघटक देवेंद्र काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, माजी पंचायत सभापती शिवा सुरासे, दत्तात्रय डुकरे, भाऊसाहेब कळसकर, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे नियोजन कारसूळचे माजी सरपंच व सरपंच सेवा संघाचे जिल्हा संघटक देवेंद्र काजळे यांनी केले.
यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे, महिला जिल्हा अध्यक्ष सोनाली कोटमे, सेवा संघाचे जिल्हा संघटक देवेंद्र काजळे, राज्य कार्यकारी सदस्य प्रसाद पाटील व निफाड पूर्व भाग अध्यक्ष मंगेश गवळी, प्रवीण नाईक, मुकुंद घुमरे आदींसह तालुक्यातील सरपंच व उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.