ठळक मुद्देसरपंचपद अनुसूचित जमाती स्त्री किंवा पुरुषांसाठी आरक्षित असते.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येत्या बुधवारी (दि. ३) रोजी दुपारी ३ वाजता इगतपुरी त्र्यंबक येथील उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर होणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार रामकिसन राठोड यांनी दिली.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के महिला सदस्य निवडून आल्या आहेत. सात सदस्य निवडून आल्यास चार महिला सदस्य असतात. नऊ जागा असल्यास पाच महिला निवडून येतात. म्हणजेच निम्म्यापेक्षा महिला सदस्यांची जागा अधिक असते. तालुका १०० टक्के आदिवासी तालुका असल्याने येथील ग्रामपंचायतींना पेसाअंतर्गत निधी मिळतो. त्यामुळे सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्री किंवा पुरुषांसाठी आरक्षित असते.