नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत निफाड तालुक्यातील कारसूल गावात सरपंच रामकृष्ण कंक यांनी शिक्षणावर भर देत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल त्यांना ‘शैक्षणिक सुविधा ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.निफाड तालुक्यातील कारसूल या गावात डिजिटल अंगणवाडीपासून प्राथमिक शाळेची अद्ययावत दुमजली इमारत बांधण्यापर्यंत तसेच डिजीटल वर्ग अन् त्यांच्या बोलक्या भींती सजविण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. पिण्याच्या पाण्यासाठी थेट शाळेपर्यंत जलवाहिनी टाकून त्यांनी विद्यार्थ्यांची तहान भागविली. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
निफाडच्या कारसूलचे सरपंच रामकृष्ण कंक यांचा ‘शैक्षणिक सुविधे’वर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 6:17 PM
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो ...
ठळक मुद्दे ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ प्राथमिक शाळेची अद्ययावत दुमजली इमारत