शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

गोदास्वच्छतेसाठी सरसावली ‘दक्षता’

By admin | Published: October 25, 2015 11:24 PM

जनसहभाग हवा : पाणवेली काढण्यास प्रारंभ

नाशिक : गोदापात्रात निर्माल्य व प्लास्टिकचा कचरा आणि सांडपाणी मिसळत असल्यामुळे पुन्हा गोदावरीच्या पाण्याला हिरवागार रंग आणि पाणवेलींचा विळखा पडू लागला आहे. यामुळे पात्र जणू हिरवाई बहरल्याचे चित्र दिसत असल्याने वेगाने नदी प्रदूषण होत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षता अभियानाच्या वतीने रविवारी (दि.२५) गोदा स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.महापालिकेच्या वतीने निर्माल्य संकलन बोट अर्थात पाण्यावरील घंटागाडीला स्थगिती देण्यात आल्याने गोदापात्रात पुन्हा पाणवेली वाढू लागल्या आहेत. सदर बाब लक्षात घेऊन पुन्हा माजी नगरसेवक विक्रांत मते यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता अभियानाच्या माध्यमातून गोदा स्वच्छता मोहिमेला आनंदवल्ली पुलाजवळून प्रारंभ करण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर गोदास्वच्छतेकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले असून, गोदाकाठालगतचा कचरादेखील नियमितपणे उचलला जात नसल्याने अस्वच्छता वाढत आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रातदेखील पाणवेलींचा पसारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वेळीच पाणवेली काढण्यास सुरुवात न झाल्यास पाणवेलींचा विळखा पात्राभोवती अधिक घट्ट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महापालिकेने तत्काळ निर्माल्य संकलन बोट सुरू करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.दक्षता अभियानाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गोदावरी स्वच्छता मोहिमेप्रसंगी शशिकांत टर्ले, डॉ. सोपान एरंडे, अंबादास तांबे, बापू मानकर, प्रताप देशमुख, जयंत खांदवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)