शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

सार्थकनगर-कैलासनगर पदपथास चौपाटीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:38 AM

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील कलानगर ते पाथर्डीगाव या रस्त्याचे रखडलेले रुं दीकरण व डांबरीकरण सुमारे अडीच वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यावेळी रस्त्याच्या रु ंदीकरणास अडथळा ठरणारे व्यावसायिकांचे पत्राचे शेड पक्के ओटे यांसह अतिक्र मण पोलिसांचा फौजफाटा घेऊन काढण्यात आली होते. या रस्त्यालगतच सार्थकनगर, कैलासनगर, पांडवनगरी, सराफनगर, शरयूनगर यांसह विविध उपनगरे असल्याने परिसरातील नागरिकांना नोकरी व्यवसायासाठी ये-जा करण्यासाठी वडाळा-पाथर्डी रस्त्याचाच वापर करावा लागतो.अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच या रस्त्यालगतच प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालय असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. परंतु सायंकाळ होताच सहा वाजेच्या दरम्यान सार्थकनगर ते कैलासनगर या वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर खाद्यपदार्थ, फळभाजीविक्रेत्यांच्या हातगाड्या लागतात त्यामुळे सायंकाळ होतात चौपाटीचे स्वरूप प्राप्त होते. त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने सर्रासपणे रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरफटका मारणाऱ्यांना पदपथाअभावी जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून मार्गक्र मण करावा लागतो. त्यातूनच लहान-मोठे अपघात घडतात. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.प्रभागाचे नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी प्रभाग सभेत अनेक वेळेस प्रशासनाला अतिक्र मणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरले तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अतिक्र मण विभाग सायंकाळ येत नाही याचाच फायदा उठवतात. हळूहळू परिसरात चौपाटीचे रूप प्राप्त होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही.सदर रस्त्यावर सायंकाळ होताच खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. सदर खाद्यपदार्थ खाण्यासाठी ग्राहकांना बसण्यासाठी पदपथावर खुर्च्या टाकल्या जातात. त्यामुळे सायंकाळी आणि ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारला जातो. तेव्हा मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही.- प्रकाश मालपाठक, ज्येष्ठ नागरिकसदर रस्ता खाद्यपदार्थ विक्रे त्यांसाठी आहे की वाहतुकीसाठी याचा खुलासा महापालिकेने लगतच असलेल्या अपार्टमेंटमधून नागरिकांना बाहेर निघणे सुद्धा मुश्किल झाले आहे. तातडीने वाहतुकीचा रस्ता मोकळा करावा.- अशोक लोळगे, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक