लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : गुंतवणुकीच्या नावाने शेकडो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे महिला ठेवीदारांनी गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर पाच तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी कायदेशीर बाबी तपासून गुन्हा नोंदविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.गेल्या सात-आठ वर्षांपासून मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा. लि. कंपनीने मालेगाव, कळवण, देवळा, बागलाण या चार तालुक्यांसाठी सटाणा शहरातील टीडीए रोडवर मध्यवर्ती कार्यालय सु्नल्ल केले होते. मैत्रेयच्या विविध योजनांच्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळतो म्हणून गरीब, कष्टकरी, नोकरी करणाऱ्या शेकडो जणांनी ठेवीच्या माध्यमातून हजारो रुपयांची गुंतवणूक केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ठेवींची मुदत संपलेल्या ठेवीदारांनी मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालय बंद झाल्याचे उघडकीस आल्याने संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे महिला ठेवीदारांनी आज गुरु वारी (दि. ६) सकाळी १० वाजता अचानक पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत मैत्रेय कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी ठिय्या दिला. यावेळी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी ठेवीदारांशी चर्चा करून ठेवीसंदर्भात कागदपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाबी तपासून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर तब्बल पाच तासांनंतर महिलांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंदोलनात आशा बागड, जिजाबाई सोनवणे, कल्पना सैंदाणे, प्रमोदिनी सोनवणे, कासूबाई पाकळे, आशा मुसळे, सारिका अहिरे, सुरेखा मेतकर, हेमलता येशी, आशा रौंदळ, वर्षा परदेशी, द्वारकाबाई ठाकरे, मंगल निकम, लता घोडके, लता अहिरे, मनीषा मुंडावरे, मनीषा अहिरे, मीना सोनवणे, मनीषा बगडाणे, सुनंदा पिंगळे, ज्योती पाठक, संध्या चंद्रात्रे, मीना धामणे, गणेश जाधव, राकेश सैंदाणे, महेंद्र अहिरे, अशोक शिरोडे, पंकज इनामदार, नटराज शिरोडे, प्रशांत धांडे यांच्यासह महिला ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.तीन कोटीला लावला चुनामैत्रेय सुवर्णसिद्धी कंपनीविरु द्ध येथील चित्र सिनेमागृहाचे व्यवस्थापक राकेश राजाराम सैंदाणे यांनी दिलेल्या तक्र ारीवरून सटाणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे (दोघे राहणार विरार, मुंबई) यांनी संगमात करून सन २०१३ ते १६ पर्यंत सटाणा शहरासह तालुक्यातील ५९४ ठेवीदारांना सोन्याचे व व्याजाचे आमिष दाखवून सुमारे तीन कोटी रु पयांची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४२०, १२०(ब), ४०६, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम १९९९ कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख, उपनिरीक्षक कृष्णा घायवट करीत आहेत.
सटाणा : तीन कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल
By admin | Published: July 07, 2017 12:26 AM