सटाणा : मालेगावपाठोपाठ आता सटाण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने संपूर्ण परिसर हादरलाआहे. एका पोलीस अधिकाऱ्यासह महिला कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झालेअसून, तातडीने बाधित झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना विलगीकरण केंद्रात भरती केलेआहे.कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने सटाणा शहर कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण शहर चहूबाजूंनी सील करण्यात येत असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. मालेगाव शहरात कोरोनाने थैमान घातले असताना आज मंगळवारी (दि. ५) सकाळी अचानक गेल्या आठ दिवसांपासून शहरात वास्तव्यास असलेली महिला तसेच फुलेनगर येथील रहिवाशी पोलीस अधिकारी कोरोनाबाधित असल्याची बातमी शहरात वाºयासारखी पसरल्याने शहरवासीयांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी तत्काळ गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, डॉ. हेमंत अहिरे यांची बैठक घेऊन दोघा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना विलगीकरणासाठी ताब्यात घेऊन भरती करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण शहर सील करणे आवश्यक असल्याने प्रांत भांगरे यांनी बाधितरु ग्ण आढळलेल्या रुग्णांचे घर केंद्रबिंदू घोषित करून त्याच्यापासून ३ किलोमीटर अंतरातील परिघाचे क्षेत्र हे कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच त्याला लागून असलेले पाच किलोमीटर परिघातील क्षेत्र हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शहर सील करण्यात येत असून, ठिकठिकाणी चेक पोस्ट ठेवण्यात येत आहेत.----------४घोषित केलेल्या क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहणार आहे. या क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. किराणा साहित्य, भाजीपाला, दवाखाना, मेडिकल या अत्यावश्यक सेवांची आवश्यकता असल्यास पालिका तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा मागणीप्रमाणे सशुल्क पुरवठा करण्यात येणार आहे. मास्कचा वापर करणे बंधनकारक असून, कोणी त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.४घोषित काळात शहरातील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार असून, वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी चेक पोस्ट ठेवून आरोग्य पथकाकडून तपसणी केली जाणार आहे. ५०-५० घरांना भेट देऊन त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. सर्व पथके कोरोनाच्या संशयास्पद रु ग्णांचे दैनंदिन परीक्षण करतील आणि लक्षणे आढल्यास त्याचा अहवाल तत्काळ सादर केला जाईल.
सटाणा प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 8:21 PM