सकाळी अकरा वाजता शहरातील भाक्षी रोड येथे सजविलेल्या रथावर साईबाबांची मोठी प्रतिमा व मूर्ती ठेवण्यात आली होती, तर पालखीतही बाबांची लहान मूर्ती ठेवून सुंदर सजविण्यात आली होती. पालखीच्या पायीयात्रेस तलाठी कॉलनीतून सुरुवात झाली. पालखी जात असताना ठिकठिकाणी थांबवून नागरिक दर्शन घेत होते. पहिल्या वर्षापासून ते आजपर्यंत या पालखीची जबाबदारी पप्पू पगार हेच घेत आहेत. मग ते पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असो किंवा चालताना, जेवणाच्या ठिकाणीही ते पालखीसोबतच जेवण करतात. ही दिंडी सटाणा, ठेंगोडा, मेशी, उमराणे, गिरणारे, मनमाड, येवला, कोपरगावमार्गे ठीक ठिकाणी मुक्काम करत दि.२५ रोजी शिर्डी येथे पोहोचेल. यावेळी दिंडीत गेलेल्या भक्तांबरोबर साई दर्शनासाठी सटाण्याहून शेवटच्यादिवशी अनेक भाविक जात असतात. दिंडी सोहळ्याची सुरुवात करतेवेळी पवन बोरसे, युवा नेते सुमित वाघ, साई सावली फाऊंडेशनचे प्रशांत कोठावदे, मुन्ना धिवरे, चेतन सूर्यवंशी, हर्षवर्धन सोनवणे, नानू दंडगव्हाळ, नीलेश अमुतकार, कुमेश नंदाळे, राधेश्याम निकम, अनिल पगार, योगेश जाधव, अक्षय सोनवणे, अमोल झेंड, अभिषेक हेडा, जयेश हिरे, बंटी वाघ, रोहित पवार आदींसह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सटाणा ते शिर्डी साई पायी पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 8:01 PM