सटाणा : तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या धरण परिसरातील गावांची ‘धरण उशाशी, कोरड घशाशी’ अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील वाठोडा गावात फेब्रुवारीच्या अखेरीस पाणीटंचाईने डोके वर काढले असून, भीषण पाणीटंचाई वर मात करण्यासाठी शासनाने येत्या आठ दिवसात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर कामे सुरू करावीत अन्यथा बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा वाठोड्याचे सरपंच लक्ष्मण महाले व ग्रामस्थांनी दिला आहे. बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले आहे. वाठोडा हे गाव गेल्या दहा ते बारा वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शासनाकडे वारंवार मागणी केल्याने सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत गावाची निवड केली होती. येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास सर्व ग्रामस्थ आपल्या प्राणिमात्रांसह बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच लक्ष्मण महाले, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, भावराव ठाकरे, चिंतामण ठाकरे, आनंद ठाकरे, उलुशा ठाकरे, सीताबाई कामडी, किसन भोये, बाबूराव ठाकरे, रमा ठाकरे, वाळू ठाकरे, मोहन ठाकरे, दत्ता ठाकरे, चिंतामण ठाकरे आदींसह शेकडो ग्रामस्थांच्या आहेत. निवेदनाच्या प्रती बागलाणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आदी विभागांना देण्यात आल्या आहेत.
सटाणा : जलयुक्तची कामे सुरू करण्याची मागणी केळझर परिसरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:08 AM
सटाणा : तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्पाच्या धरण परिसरातील गावांची ‘धरण उशाशी, कोरड घशाशी’ अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर कामे सुरू करावीत बागलाण उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण