यावेळी संगणकीकृत सात-बारा उताऱ्याचे काम करीत असताना सातबारा दप्तरातील नोंदीप्रमाणे बिनचूक करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. सात-बारा नोंदीत काही चूक झाली असल्यास अथवा माहिती अपूर्ण असल्यास तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी शेतजमिनीच्या एकूण गटांपैकी चार गटांच्या दुरुस्तीसाठी अर्ज आल्याची माहिती घुशिंगे यांनी दिली. महसूल विभागाच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी सात-बारा उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात आले असून, शेतकऱ्यांची नोंदीसाठी अथवा सात-बारा संदर्भातील इतर कामे जलदगतीने होणार आहेत.
याप्रसंगी उपसरपंच श्रावण वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती शेलार, जनार्दन गोडसे, जालिंदर शेलार, सुरेखा रोठे, अनिता खरे, अंबादास पगार, दिलीप शेलार, रवी रोठे, केशव पगार, दत्तू शेलार, कोतवाल भाऊसाहेब डावरे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आडगाव रेपाळ सजेंतर्गत येणाऱ्या आडगाव रेपाळ, मुरमी, कानडी येथे मंडल अधिकारी व्ही. सी. चंदावर यांच्या उपस्थितीत कामगार तलाठी व्ही. एस. भदाणे यांनी सात-बारा वाचन केले. आपापल्या सात-बारा उताऱ्यात काही चूक अथवा माहिती अपूर्ण असल्यास अर्ज देऊन दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मंडल अधिकारी चंदावर व तलाठी भदाणे यांनी केले. याप्रसंगी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ३० विखरणी
विखरणी येथे चावडी वाचन कार्यक्रमप्रसंगी महसूल विभागाचे आर. बी. शिरसाठ, कामगार तलाठी अमृता घुशिंगे, उपसरपंच श्रावण वाघमोडे, ज्योती शेलार, जनार्दन गोडसे, जालिंदर शेलार आदी.