लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : अखिल भारतीय बंजारा समाजाचे श्रध्दास्थान असलेला तालुक्यातील वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली वडांगळी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वडांगळीचे ग्रामविकास अधिकारी पी. एस. सरोदे, सतीमाता देवस्थान संस्थानचे सचिव अशोक चव्हाण, सदस्य रमेश खुुळे, दीपक खुळे, शरद खुळे यांच्यासह महावितरण, पाटबंधारे विभाग, महसूल, आरोग्य व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या यात्रोत्सवानिमित्त मिरवणूक न काढता व दुकाने न थाटता केवळ कोरोनाचे नियम पाळून धार्मिक कार्यक्रम करण्यावर बैठकीत एकमत झाले. पोलीस प्रशासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांना एकाचवेळी गर्दी न करता, कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेण्यासह धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
दोडी व मऱ्हळ यात्रेवर निर्बंध येण्याची शक्यता
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वडांगळी येथील सतीमाता यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याच काळात दोडी येथील श्री म्हाळोबा महाराज यात्रोत्सव असतो. या यात्रेतही लाखाच्या आसपास भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्टÑासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथील धनगर समाज बांधव दर्शनासाठी येत असतात. नवसपूर्तीसाठी मोठी गर्दी होते. त्यानंतर मºहळ येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव मोठा असतो. मात्र वडांगळी यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने या दोन यात्रोत्सवावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
फोटो- वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा (१६ सतीमाता)
===Photopath===
160221\16nsk_34_16022021_13.jpg
===Caption===
१६ सतीमाता