पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. झालेल्या पेरण्या वाया जाणार की काय, याची भीती निर्माण झाली होती तर अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, जुलै महिन्याच्या मध्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याचे दिसते आहे. पुढील काळात पाऊस कसा येतो, यावरच खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मका, कडधान्य या पिकांची प्रामुख्याने पेरणी होते. यासोबत भाजीपाला पिकाचे उत्पादन या परिसरात होत असते. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पुढील रब्बी हंगामाचे गणित बांधून बहुतांश शेतकरी खरीप पिकांचे नियोजन करताना दिसत आहेत. पावसाळा उशिरा सुरू झाला तरी अद्याप सर्व नदी, नाले कोरडेच आहेत. यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. चांगल्या पावसानंतर ही पातळी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ताहाराबादला पावसामुळे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:12 AM