नाशिक : सातपूर परिसरातील महादेवनगर भागात शुक्रवारी सकाळी एका लहान मुलीला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाल्याची घटना घडली. या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले असून, महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांनी या घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.सातपूर भागात महादेवनगरमधील महालक्ष्मी चौक येथे सृष्टी संतोष आगरे या मुलीला मोकाट कुत्र्याने मांडीला चावा घेतल्याने ती जखमी झाली. याचवेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन निगळ, चेतन निगळ यांनी तातडीने दूरध्वनीवरून महापालिका अधिकाºयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी या भागात येऊन घटनास्थळी पाहणी केली तसेच मनपा कर्मचाºयांना कुत्रे पकडण्याचे आदेश दिले. मनपा कर्मचारी रंगनाथ काळे, योगेश कापडे व त्यांच्या सहकाºयांनी सदर कुत्र्याला पकडून नेले. या भागातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, महिला व नागरिकांच्या जिवाला धोका असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी मनपाच्या संबंधित अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातपूर परिसर : अनेक दिवसांपासून उपद्रवमोकाट कुत्र्याचा मुलीला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:22 AM
सातपूर परिसरातील महादेवनगर भागात शुक्रवारी सकाळी एका लहान मुलीला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाल्याची घटना घडली.
ठळक मुद्देकुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीतमांडीला चावा घेतल्याने जखमी घटनास्थळी पाहणी