कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न होत आहेत. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सातपूर परिसर हा दोन लाखांच्या आसपास लोकवस्तीचा भाग असून कोणतेही मोठे सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. सद्यस्थितीत प्रत्येक घरात जवळपास एक कोरोना रुग्ण आहे. त्यांची मोठी गैरसोय होत आहे. शहरात कुठेही बेड मिळत नाही. रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे सातपूरला तातडीने सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यात यावे,अशी मागणी केली जात आहे.
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल अयोध्या येथे घेण्यात आली. बैठकीस आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, मनसे गटनेता सलीम शेख, शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, शशिकांत जाधव, योगेश शेवरे,मधुकर जाधव, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, पल्लवी पाटील,श्री छत्रपती शिवाजी मंडईचे अध्यक्ष शंकर पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे, मनसे अध्यक्ष योगेश लभडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जीवन रायते, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,नितीन निगळ, दीपक मौले,सुनील मौले,गौरव जाधव, राजेश दराडे, बसपाचे अरुण काळे, गणेश बोलकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोमवारपासून सात दिवस सातपूर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
चौकट===
शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. तरीही स्थानिक पातळीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातपूर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आपण आपल्यासाठी घेतला आहे. बंदच्या काळात थोडीफार अडचण निर्माण होणार आहे. ती सहन केली पाहिजे. अडचण आलीच तर स्थानिक स्तरावर ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
-नितीन निगळ, संयोजक
(फोटो १६ सातपुर)- सातपूर बंद ठेवण्यासाठी आयोजित बैठकीत सहभागी झालेले आ. सीमा हिरे. समवेत दिनकर पाटील, सलीम शेख, विलास शिंदे, संतोष गायकवाड, शशिकांत जाधव, योगेश शेवरे, मधुकर जाधव, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, पल्लवी पाटील, नितीन निगळ, अमोल इघे, योगेश लभडे, जीवन रायते, बाळासाहेब जाधव, दीपक मौले, सुनील मौले, गौरव जाधव, राजेश दराडे, अरुण काळे आदी.