सातपूर : विभागात धूर फवारणी होत नाही, सर्वत्र अस्वच्छता, हॉकर्स झोन, बंद पथदीप, अनियमित घंटागाडी, रस्त्यावर पडलेले खड्डे, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अतिक्रमण यांसारख्या समस्या उपस्थित करीत संबंधित अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला व कामचुकार अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी करत संतप्त नगरसेवकांनी विभागीय अधिकाºयांना धारेवर धरले.सातपूर प्रभाग समितीची बैठक सभापती माधुरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत संतप्त सदस्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. प्रभाग आठमधील गणेशनगर, शंकरनगर येथील मनपाच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडाचा वापर खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी सर्रास वापर होत आहे. सदर व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी संतोष गायकवाड यांनी केली. सर्वच प्रभागात धूर फवारणी करावी, नियमित साफसफाई करण्यात यावी, हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावावा, पथदीप सुरू करावेत, नियमित घंटागाडी, रस्त्यावर पडलेले खड्डे, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, गावातील मार्केटमध्ये साफसफाई करण्यात यावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अंबड लिंकरोडचे अतिक्र मण हटविण्यात यावे यांसह विविध समस्या सोडविण्यात याव्यात आणि कामचुकार अधिकाºयांवर विभागीय अधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी दीक्षा लोंढे, पल्लवी पाटील, सीमा निगळ, नयना गांगुर्डे, सुदाम नागरे, योगेश शेवरे, वर्षा भालेराव, अलका आहेर, हेमलता कांडेकर, रवींद्र धिवरे, राधा बेंडकोळी, हर्षदा गायकर आदींनी केली. यावेळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, नगरसचिव ए. पी. वाघ, संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते.
सातपूर प्रभाग सभेत अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:24 AM