नाशिक : सातपूर परिसरातील महादेववाडीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़ ३०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे़ महादेववाडीतील नासर्डी पुलाखाली असलेल्या मोरी नंबर तीनच्या आडोशाला पत्त्यांवर पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित सुधीर गोविंदराव शिंदे (५२, रा. पिंपळगाव बहुला) व शरद विठ्ठल जाधव (४२, रा. सातपूर) हे जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नशेत कार चालविणा-या विरोधात गुन्हामद्याच्या नशेत वेडीवाकडी कार चालविणाºया चालकाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सुदाम हंसवाणी (वय ३०, रा. २७, होलाराम कॉलनी, शरणपूररोड, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. ३०) दुपारी मद्य सेवन करून कार (एमएच १५, ईपी ७२७६) गंगापूर रोडवरील हॉलमार्क चौकातून भरधाव व वेडीवाकडी चालवित होते़ या प्रकरणी पोलीस शिपाई तुषार देसले यांनी फिर्याद दिली आहे़पार्किंगमधून दुचाकीची चोरीजुने नाशिकमधील शिंपी गल्लीतील रहिवासी अमित पवार यांची तीस हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफडी ३१३६) चोरट्यांनी शनिवारी (दि. २७) गंगापूर रोडवरील सुयोजित गार्डनच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरीहिरावाडीतील बनारसीनगरमधील रुद्रा रेसिडेन्सीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़ २९) घडली़ राणी मारुती पगारे (फ्लॅट नंबर ३०४) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ तसेच घरातील कपाटातून २५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत, ओमपान असे तीस हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूरला महादेववाडीजवळ जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:20 AM