रुद्र फाउंडेशन निर्मित,प्रा.नितीन बानगुडे पाटील लिखित श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम दाखविणारे शंभूराजे या ऐतिहासिक महानाट्याचे सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर शिवतीर्थ अर्थात शिवरायांचे आकर्षक देखणे असे मंदिर उभारण्यात आले आहे. यावेळी नेत्रदीपक, आकर्षक आतिषबाजी,अत्याधुनिक ध्वनी-प्रकाशयोजना, अभिजात लोककलांनी नटलेला ऐतिहासिक सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज जन्म ते त्याच्या बलिदानापर्यंतचा धगधगता इतिहास दाखविणारे अभिजात लोककलांनी नटलेल्या ऐतिहासिक नाट्यप्रसंग दाखविण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सातपूर भाजी मंडईतील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे. जाणता राजा मैदानावर मंदिरातील शिवप्रतिमेचे अभिषेक व पूजन केले जाणार आहे. सायंकाळी कार्यक्रमस्थळी मुख्य प्रवेशद्वारापासून सातपूर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
इन्फो===
यावर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया असली तरी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. सॅनिटायझरचा वापर,सक्तीचे मास्क आणि शारीरिक अंतर ठेवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून शिवप्रेमींनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष गंगाराम सावळे यांनी केले आहे.
(फोटो १८ सातपुर) सातपुरला आयोजित ‘शंभूराजे’’ या ऐतिहासिक महानाट्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाची तयारी अंतिम टप्प्यात.