सातपूर : येथील श्रमिकनगरमधील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सव्वा लाखाच्या मुद्देमालासह जुगार खेळणाºया ५५ लोकांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जुगाऱ्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.श्रमिकनगर येथील राधिका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर अवैध जुगार अड्डा असून, तेथे जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला खबºयांकडून समजली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी छापा मारला असता तेथे जुगार खेळत असल्याचे दिसून आले.जुगार खेळणाºया ५५ लोकांसह हॉटेल मालक अनिल शेजवळ यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख २४ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ५५ लोकांवर सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण पुढील तपास करीत आहेत. यापूवीर्ही अनेक ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून लोकांना अटक केली आहे. परंतु गुरुवारी टाकलेल्या धाडीत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी या ५५ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.नागरिकांची तक्रारश्रमिकनगर येथील राधिका हॉटेलच्या वरच्या मजल्यावर नेहमीच अवैध जुगार अड्डा चालविला जात असल्याने यापूर्वीदेखील अनेकवेळा पोलिसांनी छापा मारला आहे. तरीही हा अड्डा पूर्णपणे बंद होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पोलिसांनी कडक कारवाई करून हा अड्डा कायमस्वरूपी बंद करावा, अशीही मागणी होत आहे.
सातपूरला जुगार अड्ड्यावर छापा; ५५ जुगाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:18 AM