गायकवाड राजे कुटुंब मळ्यात वास्तव्याला आहेत. स्वतः राजे यांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला. त्यांच्या चिरंजीवांनी त्यांना उपचारासाठी एका खासगी डॉक्टरकडे नेले. संबंधित डॉक्टरांनी कोणतेही उपचार न करता त्यांना मालेगाव येथे सीटीस्कॅन करण्यासाठी पाठविले. त्यांचा सीटीस्कॅनचा रिपोर्ट पाहता ९ काउंट आलेला होता. डॉक्टरांनी त्यांना खासगी कोरोना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र राजे यांनी घरीच उपचार करण्याचे ठरविले आणि आहार-विहारावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी कोरोनामुक्त होण्यासाठी एकही औषध घेतले नाही. सकाळी एक ग्लास दूध, फळे, खजूर, बदाम, अंडी तर सात्त्विक आहार सुरू केला. आठ दिवसातच त्यांच्या प्रकृतीत फरक पडला. प्रतिकारशक्ती वाढल्याने ते कोरोनामुक्त झाले.
दरम्यान, त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही कोरोनाने वेढले होते. त्यांच्यावरही कोणताही उपचार न करता आहार-विहाराने संपूर्ण कुटुंब कोरोनामुक्त झाले. कुस्ती आणि कबड्डीपटू असलेले राजे राजकारणात आले. त्यांनी नगरसेवक व बाजार समितीचे संचालकपददेखील भूषविले आहे. कोरोनाबाबत रुग्णांमध्ये भीती घालून देण्यात येत असून सकारात्मक विचार ठेवल्यास कोरोनातून आपण बरे होऊ शकतो, असे राजे भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
फोटो- २५ राजे गायकवाड
===Photopath===
250521\25nsk_31_25052021_13.jpg
===Caption===
फोटो- २५ राजे गायकवाड