नाशिक : शहरातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी बुधवारपासून सुरू झाली असून या पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. अथवा प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने ऑप्शन फॉर्म भरण्याची संधी या फेरीत मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत पसंतीचे महाविद्यालय निवडून ऑप्शन फॉर्म भरावा लागणार असून दुसऱ्या फेरीसाठी शनिवारी (दि. ४) गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
शहरातील अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत अर्ज करून न शकेलल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरून त्यांची पडताळणी करण्यासोबतच अर्जाच्या भाग दोनचा ऑप्शन फॉर्म भरून अर्ज निश्चित करावा लागणार आहे. भाग दोन भरून निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादीत समावेश होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच अर्जाचा भाग दोन भरणे, दुरुस्ती करण्याची संधी असेल. त्यासाठी गुरुवारी (दि २) रात्री आठपर्यंत मुदत देणयात आली असून अर्जाद्वारे उपल्ब्ध माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी शुक्रवार (दि.. ३) राखीव ठेवला आहे, तर शनिवारी (दि ४) दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्ध होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवार दि. ६)पर्यंत मुदत असेल.