डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च १९३० पासून सलग ७ दिवस काळाराम मंदिर सत्याग्रह करण्यात आला होता. त्या घटनेला ९१ वर्षं पूर्ण होत असून, चळवळीतील तमाम अनुयायांना मार्गदर्शक ठरलेला या ऐतिहासिक सत्याग्रहातील सत्याग्रहींना यावेळी अभिवादन करण्यात येणार आहे. दीपचंद दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अभिवादन सभेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दीपकभाई नन्नावरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
एकदतावादी आरपीआय गटाचे नानासाहेब इंदरिसे, माजी महापौर अशोक दिवे, माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, ज्येष्ठ नेते तानसेन नन्नावरे उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रकाश पगारे, संजय साबळे सत्याग्रह आणि चळवळ विषयावर मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. दरम्यान, अभिवादन सभेनंतर शाहीर अनिरुद्ध वनकर यांचा ‘मी वादळ वारा’ हा भीमगीतांचा जंगी शाहिरी जलसा’ आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात शासनाने ठरवून दिलेल्या सर्व कोरोना-१९ या नियमावलीचे पालन करण्यात येणार असून प्रवेशद्वारावर सॅनेटायझर व मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अशोकभाऊ ढिवे, प्रकाश पगारे, आदेश पगारे. दीपकभाई नन्नावरे, दीपचंद दोंदे यांनी दिली.