दिंडोरी : शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालुक्यांतील शेतकºयांनी शुक्रवारी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी संदीप जगताप, गंगाधर निखाडे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला. हा देश कृषिप्रधान असून, या देशात रोज शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत ही दुर्दैवी बाब असून, हे थांबविण्यासाठी शेतकºयांना कायद्याने हमीभावाचा व कर्जमुक्तीचा अधिकार मिळायला हवा. या संदर्भातले खासदार राजू शेट्टी यांनी तयार केलेलं हमीभाव व कर्जमुक्तीचं विधेयक संसदेत मंजूर व्हावे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे व तसा आग्रह लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींकडे धरावा, असे मत यावेळी संदीप जगताप यांनी व्यक्त केलं. नरहरी झिरवळ यांनी निवेदन स्वीकारल्यावर मी तुमच्या भावना निश्चितपणे राष्ट्रपतींना कळवीन. मी व माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. खासदारसाहेबांच्या घरासमोरील आंदोलनात मीही सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या सत्याग्रहात संदीप जगताप, गंगाधर निखाडे, सचिन कड, संपत जाधव, नितीन देशमुख, अजित कड, राकेश शिंदे, संजय निरगुडे, विलास सरोदे, अभय सूर्यवंशी, मुकुंद अहेर, जनार्दन चौधरी, भाऊसाहेब पाटील, सुधीर पाटील, संजय निरगुडे, राजेंद्र मोकाट, अशोक पताडे, जीवन मोरे, अजय मेधने, कचरू मोरे, गंगाधर गाढवे, जनार्धन चौधरी, नितीन भालेराव, कृष्णा मातेरे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. आम्ही रस्त्यावर उतरण्यापेक्षा आमच्या लोकप्रतिनिधींनीच आमच्या साठी कायदे मंडळात भांडावे. शेतकºयांचे शोषण होईल असे कायदे मोडीत काढून नव शेतकरी हिताचे कायदे करावे. तसेच पाकिस्तनातून आलेली साखर , तूर ही शेतकºयांचा जीव घेणारी आहे. असे मत गंगाधार निखाडे यांनी मांडले. यावेळी डॉ योगेश गोसावी, भास्कर भगरे, अभय सूर्यवंशी, जीवन मोरे आदींनी आपले विचार मांडले.
नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:16 AM