नाशिक : बीसीसीआय तर्फे वडोदरा येथे १० ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धा सय्यद मुश्ताक अली चषक - आयोजित करण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता. महाराष्ट्राने या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते. मागील वर्षी सुध्दा या स्पर्धेत सत्यजित ने उत्कृष्ठ कामगिरी केली होती. यावर्षी आयपीएल ऑक्शन पूर्वीच मुश्ताक अली ट्रॉफी होणार असल्याकारणाने यावर्षी सत्यजित बच्छाव च्या कामगिरीकडे आयपीएल संघांचे लक्ष असेल व यंदा देखील या स्पर्धेत मागील वर्षाप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी करून सत्यजित आयपीएल स्पर्धेत दिसेल अशी नाशिककर क्रीडा रसिकांना जोरदार अपेक्षा आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा सामना गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश,बडोदा व उत्तराखंड विरुद्ध होणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.स्पर्धेकरिता निवडलेला महाराष्ट्र संघराहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, स्वप्निल गुगळे, सत्यजित बच्छाव, अजीम काजी, नौशाद शेख, रणजित निकम, तरंजित ढिल्लन, निखिल नाईक ,विशांत मोरे. श्यामसुझामा काजी,जगदीश झोपे, प्रदीप दाढे, मनोज इंगळे, मुकेश चौधरी, दिव्यांग हिंगणेकर, राजवर्धन हंगर्गेकर,धनराज परदेशी व सनी पंडित
मुश्ताक अली स्पर्धेसाठी सत्यजीत महाराष्ट्र संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:36 PM
नाशिक : बीसीसीआय तर्फे वडोदरा येथे १० ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता.